होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय ,जगभरात इंधन पुरवठ्यावर होणार परिणाम;इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची नवी रणनीती

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

मुंबई : होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय दबावाचे साधन म्हणून वापरला पाहिजे, असे थेट विधान इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई (वय ५६) यांनी गुरुवारी केले. त्यांनी इराणकडून अरब देशांवर हल्ले सुरूच राहतील, असाही इशारा दिला.इराणच्या आधिपत्याखाली असलेल्या एकाही बेटावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण झाल्यास पर्शियाच्या आखातात आक्रमकांच्या रक्ताचा सडा पडेल, अशी गर्भित धमकी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालीबाफ यांनी गुरुवारी दिली.इराणच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच खामेनेईंनी राष्ट्रीय टीव्हीवरून हे विधान केले. खामेनेईंचे हे विधान एका निवेदकाने वाचून दाखवले. यात खामेनेई स्वतः पडद्यावर दिसले नाहीत. आमच्यावर भविष्यात हल्ले होणार नाहीत, याची हमी मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील, असाही इशारा खामेनेईंनी दिला. इस्रायल-अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मोज्तबा हे जखमी झाल्याचा इस्रायलच्या गुप्तचर खात्याचा अंदाज आहे.खामेनेई यांनी युद्धात, तसेच एका शाळेवरील हल्ल्यात ठार झालेल्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली. त्यांनी अमेरिकेचा उल्लेख करत इराण आपल्या शत्रूकडून भरपाई वसूल करील, असेही विधान केले. जर अमेरिकेने भरपाई देण्यास नकार दिला गेला तर इराण त्यांच्या मालमत्तेतून ती वसूल करेल किंवा त्यांच्या मालमत्तांचा विध्वंस करेल, असा इशारा त्यांनी दिला.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *