‘कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग लवकरच पूर्ण’, केंद्रीयमंत्री गडकरी यांची राज्यसभेत माहिती’

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

मुंबई: कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पर्यावरणविषयक परवानग्यांसह इतर कारणांमुळे रखडले होते. मात्र, अडथळे दूर करत पुढील काही महिन्यांत संपूर्ण प्रकल्प मार्गी लावला जाईल,” असे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य संजय राऊत यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचा पहिला टप्पा एक हजार ३२ रुपये खर्चाचा असून, ‘हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल’ अंतर्गत याचे ८६ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. जमीन संपादनाच्या प्रक्रियेमुळे काही ठिकाणी काम थांबले आहे. हे काम चार ते सहा महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.दुसरा टप्पा ४२.२ किलोमीटर लांबीचा असून, या टप्प्याचे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तिसरा टप्पा ३२.९६ किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी २ हजार ५६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या टप्प्यातील ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *