रत्नागिरी : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जय प्रणोती राजेंद्र रांगणकर या विद्यार्थ्याने उत्तम यश संपादन करत सुयश मिळवले आहे. जयची निवड पडवे (ता. राजापूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाली आहे.
जय हा पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीचा विद्यार्थी असून, या शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले. त्याचे वडील श्री. राजेंद्र रांगणकर (प्राथमिक शिक्षक) आणि आई प्रणोती रांगणकर यांचा तसेच आप्तेष्ट व मित्रमंडळींचा भक्कम पाठिंबा त्याला मिळाला.
जयच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याने आगामी शिक्षणातही असेच यश संपादन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
राजापूर: नवोदय विद्यालय परीक्षेत जय रांगणकरचे यश
