GRAMIN SEARCH BANNER

पालीत आरोग्य शिबिर  संपन्न

Gramin Varta
89 Views

पाली : प्राथमिक आरोग्य केंद्र खानू अंतर्गत आरोग्य उपकेंद्र पाली यांच्यावतीने ग्रामपंचायत पाली येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या मोहिमे अंतर्गत आज पाली ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. यावेळी अनेक रुग्णांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी पाली सरपंच विठ्ठल सावंत,उपसरपंच संतोष धाडवे, माजी सरपंच संदीप गराटे, ग्रामविकास अधिकारी आशिष खोचाडे,प्राथमिक आरोग्य केंद्र खानूच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपशिखा,डॉ.मंगेश पायगव्हाण,आरोग्य निरीक्षक राजेंद्र रणसे,महादेव आखाडे, आरोग्य सहाय्यीका पुष्पा शेकदार,मृणाली पवार, समुदाय आरोग्य अधिकारी जान्हवी सावंत,आरोग्य सेविका मुक्ता भस्मे,चैताली भाटकर, उज्वला राणे, उज्वला लाड,आरोग्य सेवक विजय पवार,सचिन रसाळ, एचएलएललॅब असिस्टंट स्नेहल घवाळी,गट प्रवर्तक, सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

आरोग्य शिबिरात ग्रामस्थांचे रक्त तपासणी याबरोबरच आरोग्य, ईसीजी,संसर्गजन्य आजार एनसीडी, बीपी, शुगर, कॅन्सर, किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी व समुपदेशन, पोषण आहार इत्यादीची माहिती, गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराचा ग्रामस्थांनी लाभ घेतला व त्यांना त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

Total Visitor Counter

3366985
Share This Article