GRAMIN SEARCH BANNER

गुहागरमध्ये डास आणि उंदरांचा वाढता प्रादुर्भाव;नागरीक त्रस्त

Gramin Varta
100 Views

गुहागर – तुंबलेले नाले, त्यावर दिसणारी डासांची अंडी, घरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेला उंदरांचा प्रादुर्भाव यामुळे गुहागरमध्ये नागरीक त्रस्त झाले आहेत.

सार्वजनिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणा विविध उपाय करत असतात. मात्र सध्या गुहागरमध्ये निर्माण झालेलं हे चित्र या यंत्रणांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं करत आहेत.
गेली अनेक वर्ष या गावात कायम राहणारी, सणासुदीला गावात येणारी असे सर्वच मंडळी या समस्यांवर उपाय शोधत आहेत. एका दिवसात सहा सहा उंदीर एकेका घरात मेलेले आढळत आहेत. हा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर भविष्यात समस्त नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणारे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, रॅट बाईट फिव्हर या सारखे आजार उद्भवू शकतात. वरचा पाट, अष्टवणे, दुर्गादेवी परीसर या भागात हा प्रादुर्भाव अधिक आढळत आहे. त्यामुळे संबंधित आरोग्य यंत्रणांनी याकडे तातडीने लक्ष देत ठोस उपाय योजना करावी अशी विनंती येथील नागरीक करत आहेत.  तसंच नागरिकांनीही या परिसराची जास्तीत जास्त स्वच्छता कशी ठेवता येईल याकडेही लक्ष देण्याचं आवाहन परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी करत आहेत.

Total Visitor Counter

3366871
Share This Article