GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : रायपाटण येथून प्रौढ बेपत्ता; चिठ्ठीत लिहिल कारण…घरचे चिंतेत

Gramin Varta
1.7k Views

तुषार पाचलकर / राजापूर : तालुक्यातील रायपाटण (टक्केवाडी) येथील गणेश दत्ताराम पांचाळ (वय ५०) हे 8 नोव्हेंबर पासून घरातून बेपत्ता झाले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी घरात एक चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी वाचून घरचे चिंतेत आहेत.

८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घरात गणेश पाचाळ यांनी चिठ्ठीत लिहिल आहे, मी आजाराला कंटाळून आयुष्य संपवत आहे. “माझा कोणाशीही कोणताही वाद किंवा संबंध नाही. मी माझ्या आजाराला कंटाळून हे पाऊल उचलत आहे,” कोणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले आहे. या चिठ्ठीने घरच्यांची झोप उडवली आहे. त्यांचे शोध सुरू आहे. मात्र 3 दिवसांनंतरही ते अद्याप सापडलेले नाही. गणेश पांचाळ यांच्या बेपत्ताची तक्रार भावाने राजापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे. माझा भाऊ गणेश यांनी वहिनी वैशाली पांचाळ यांना लांजा येथील नातेवाईकांकडे जातो असे सांगून निघून गेले आहे. ते अद्यापपर्यंत घरी परतलेले नाहीत. असे तक्रारीत म्हटले आहे. यानुसार राजापूर पोलिस घटनेचा तपास करत आहे. या व्यक्तीबद्दल कोणाला माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3369558
Share This Article