GRAMIN SEARCH BANNER

अल्पवयीन युवकाशी असभ्य वर्तन; बिहारच्या तरुणावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
148 Views

खेड :खेड तालुक्यात एका ११ वर्षीय अल्पवयीन युवकाशी अत्यंत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणावर बुधवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी नरसिंहनारायण सिंग (वय ३५, रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि पीडित युवकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही संतापजनक घटना दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. पीडित अल्पवयीन युवक घराबाहेर खेळत असताना संशयित रवी सिंग याने त्याला जवळ बोलावले आणि त्याच्याशी असभ्य वर्तन केले.
हा प्रकार घडल्यानंतर पीडित युवकाने तातडीने ही बाब आपल्या वडिलांच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वडिलांनी त्वरित खेड पोलीस ठाणे गाठले आणि संशयित रवी नरसिंहनारायण सिंग याच्या विरोधात रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा भादंविच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड हे करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून संशयिताला लवकरच अटक केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3388461
Share This Article