GRAMIN SEARCH BANNER

चैतन्यमूर्ती आण्णासाहेब पट्टेकर महाराज पुण्यतिथी उत्सवाचे ठाणे येथे आयोजन!

Gramin Varta
42 Views

ठाणे : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैतन्याचे मांगल्य मूर्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या प.पू.संत श्री.गजानन महाराज पट्टेकर उर्फ श्री.संत अण्णासाहेब पट्टेकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव त्यांच्या असंख्य भक्तांतर्फे महाराज ज्या स्थानावरून  दर्शनआशिर्वाद देत त्या हेमंतनिवास ऐदलजी रोड ठाणे-प. येथे असंख्य भाविकांच्या  उपस्थितीत अतिशय श्रध्दा-प्रेम-भक्ती भावाने गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते १.३० या वेळेमध्ये साजरा करण्यांत येणार आहे.

यानिमित्ताने भजन-पूजन-नामस्मरण आदि धार्मिक कार्यक्रम होणार असून सकाळी ११ वाजता महाराजांचा प्रयाणकाळ होणार असून त्यानतंर आरती व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होईल.

तसेच पुज्य पट्टेकर महाराजांचा जन्मोत्सव धनत्रयोदशी दिनी शनिवार दि.१८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते रात्रौ ८.०० पर्यंत साजरा करण्यात येणार आहे,तरी जास्तीत-जास्त भाविक भक्तांनी  उपस्थित राहून महाराजांचे दिव्य तसबिरींचे व चैतन्यमय पादुकांचे
दर्शन-आशिर्वाद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन श्रीसंत गजानन महाराज पट्टेकर संस्थानतर्फे करण्यांत आले असून यावेळी सर्वाना महाप्रसाद देण्यात येणार आहे!

Total Visitor Counter

3369376
Share This Article