GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत प्रथमच महिलांसाठी पर्यटन क्षेत्रातील करिअर संधीवर मोफत कार्यशाळा

Gramin Varta
36 Views

रत्नागिरी: महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि कोकणातील पर्यटन क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा या उद्देशाने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे “पर्यटनातील करिअर – दिशा आणि संधी” या विषयावर मोफत शैक्षणिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कोकणात पर्यटनासाठी व व्यवसायासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यात महिलांनाही अनेक संधी आहेत. एअरपोर्ट, हॉटेल्स, ट्रॅव्हल कंपन्या, रिसॉर्ट्स याठिकाणी नोकरीच्या संधी आहे. टूर गाइड, टूर कोऑर्डिनेटर, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह अशा भूमिका निभावण्याची तयारी कोकणातील महिलांसाठी स्थानिक व आंतरराष्ट्रीय पर्यटनात सहभाग घेण्याची संधी, स्वतःचे होम स्टे अशा व अनेकविध संधी उपलब्ध आहेत. पर्यटन करताना करिअर घडवता येईल का, ट्रॅव्हल, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करता येईल का, पदवी शिक्षण करताना पर्यटन विषयातील व्यावसायिक शिक्षण घेता येईल का, असे अनेक प्रश्न महिलांना सतावत असतात. यासाठी संपूर्ण कोकणातील महिलांसाठी एक नवी दिशा देणारी ही कार्यशाळा असणार आहे.

या कार्यशाळेत महिलांसाठी पर्यटन क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, आवश्यक कौशल्ये, कोकणातील पर्यटन उद्योगाचा विस्तार, पुढील काळात पर्यटनात उदयास येणाऱ्या करिअरच्या दिशा याबाबत पर्यटन क्षेत्रातील विविध तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. प्रश्नोत्तर सत्रही होणार असून सहभागी होणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. कार्यशाळेसाठी प्रवेश विनामूल्य असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

कार्यशाळा २१ जुलै रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह रत्नागिरी येथे होणार आहे. कार्यशाळेनंतर व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे बारावीनंतर कोणत्याही शाखेतील महिलांसाठी एक वर्षाचा पार्ट टाइम डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच करिअर तयार संधी यामार्फत महिलांना मिळणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी 7499821369 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा रत्नागिरी प्रकल्प आणि बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्या तसेच प्राचीन कोकणच्या संचालिका सौ. स्वरूपा सरदेसाई आणि प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी केले आहे.

Total Visitor Counter

2649958
Share This Article