रुग्णांना मोफत औषधे, चष्मांचे वाटप, बाबू पाटील मित्र मंडळाकडून आयोजन
रत्नागिरी: बाबूशेठ पाटील मित्रमंडळाच्यावतीने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराला वाटद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. मुंबईतून आलेल्या विविध वैद्यकीय पथकाने तेराशेहून अधिक ग्रामस्थांची तपासणी केली.
बाबूशेठ पाटील मित्र मंडळाच्यावतीने माजी जि.प. सदस्य प्रसाद उर्फ बाबू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, नेताजी पाटील, माजी पं.स. सभापती प्रकाश साळवी, विभागप्रमुख योगेश कल्याणकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
या महाआरोग्य शिबिराला वाटद पंचक्रोशीच्या गावामधून उंदड प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातून मोठ्यासंख्येने ग्रामस्थ आरोग्य शिबिरात दाखल होत आपली आरोग्य तपासणी करुन घेतली. डोळे, हाडांची दुखणी यांच्यासह विविध आजारांची तपासणी या शिबिरात झाली. अगदी चष्म्यापासून, एक्सरेपर्यंतच्या सुविधा ग्रामस्थांना मोफत देण्यात आल्या. ज्या ग्रामस्थांना मोतीबिंदू असल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे. त्यांच्या औषधोपचारांचा पुढील खर्चही बाबू पाटील मित्र मंडळाकडून केला जाणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात जवळपास चार ते पाच लाखांची औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. रत्नागिरीतील लोकमान्य रुग्णालयाकडून वैद्यकीय पथकाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपयर्र्त हे महाआरोग्य शिबीर सुरु होते. तेराशेहून अधिक ग्रामस्थांनी आरोग्य शिबिराला भेट देत तपासणी करुन घेतली व बाबू पाटील यांचे आभार मानले. हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यामध्ये बाबू पाटील मित्र मंडळाच्या पदाधिकार्यांनी मोठी मेहनत केली.
वाटद येथील महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांनी घेतला लाभ
