रत्नागिरी: ठेकेदाराच्या बेफिकीर कारभारामुळे रस्त्यावर जीवघेणे अपघात होत आहेत. त्याचा फटका थेट प्रवासी व वाहनचालकांना बसत आहे. विमानतळ येथे रत्नागिरी–केळ्ये–आंबेकोंड बसला अपघात झाला. या दुर्घटनेत २ प्रवासी जखमी झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बुधवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून केळ्ये–आंबेकोंडकडे जाणारी बस दुसऱ्या वाहनाला साईट देत असताना, चालकाने गाडी रस्त्याच्या साईटपट्टीवरून खाली उतरवली. मात्र रस्त्याच्या कडेला विद्युतवाहिनीसाठी खोदलेल्या चरात ही बस फसली आणि दोघांना दुखापत झाली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे चर वेळेत बुजवला गेला नसल्यामुळे अपघात होत आहेत.
अपघातानंतर परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. तर स्थानिकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागला. नागरिकांनी संतप्त होत ठेकेदारावर ताशेरे ओढले.
हा अपघात ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम असल्याचे दिसत आहे. रस्त्यावरचे खड्डे व खोदकामामुळे निर्माण झालेले धोके यामुळे रोजच्या रोज नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत. ठेकेदाराने काळजीपूर्वक रस्त्याकडेचे चर बुवाजवावेत अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी-केळ्ये-आंबेकोंड बसला अपघात, २ जखमी, ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका
