लांजा | प्रतिनिधी
दीपावलीच्या शुभप्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत कॉलेज परिसर रहिवासी संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नगरपंचायत व महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि दिवाळी भेट देण्यात आली. हा कार्यक्रम दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी संघाचे अध्यक्ष श्री. दिनेश झोरे यांच्या निवासस्थानी पार पडला.
या वेळी महावितरणचे वायरमन श्री. तुषार कांबळे, पाणीपुरवठा करणारे श्री. नामये मारळकर, नगरपंचायत स्ट्रीट लाईट देखभाल करणारे श्री. जयेश खावडकर, श्री. गुरव, तसेच घंटा गाडी चालक श्री. आग्रे यांचा सर्व सभासदांच्या वतीने सत्कार करून दिवाळी भेट देण्यात आली.
कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष श्री. दिनेश झोरे, उपाध्यक्ष दिलीप (भाई) चौगुले, कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत कदम, ज्येष्ठ सभासद व प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर श्री. राजू प्रभुदेसाई, श्री. कुलकर्णी सर, नचिकेत शेट्ये, विलास गोरे सर, शुभम चव्हाण, दिनेश चल्लावाड, राज गवाणकर आणि नागेश काटगाळकर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. मारळकर यांनी सांगितले की, “मंडळाचा हा स्तुत्य उपक्रम आम्हा कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.”
कॉलेज परिसर रहिवासी संघातर्फे दीपावलीनिमित्त नगरपंचायत व महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार, दिवाळी भेट
