GRAMIN SEARCH BANNER

देवरुखला कबड्डीत राष्ट्रीय स्तरावर ओळख देण्यासाठी कांगणे वाडीत भव्य कबड्डी स्टेडियम उभारणार: डॉ. मंगेश कांगणे

Gramin Varta
109 Views

गाव विकास समिती व आम आदमी पार्टी युतीच्या उमेदवार सौ.दिक्षा खंडागळे – गिते यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्याचे तरुणांना आवाहन

देवरुख:देवरुख शहराला कबड्डी खेळात राष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख निर्माण करून देण्याच्या उद्देशाने कांगणे वाडी येथे एक सुसज्य आणि भव्य कबड्डी स्टेडियम उभारले जाईल, असे आश्वासन गाव विकास समितीचे निवडणूक प्रभारी डॉ. मंगेश कांगणे यांनी दिले आहे. या स्टेडियमच्या माध्यमातून भागातील क्रीडा संस्कृती जपण्याचा आणि तिला प्रोत्साहन देण्याचा गाव विकास समितीचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गाव विकास समिती व आम आदमी पार्टी युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दिक्षा खंडागळे-गिते यांना निवडून देण्याचे आवाहन डॉ.कांगणे यांनी केले आहे.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना डॉ. कांगणे म्हणाले, “गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे आणि अध्यक्ष उदय गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जाईल.ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन मिळावे ही गाव विकास समितीची भूमिका आहे.हे स्टेडियम उभारताना देवरुख शहरातील जुन्या जाणत्या कबड्डी प्रेमी खेळाडूंकडून सूचना मागवल्या जातील आणि जेष्ठ खेळाडूंची एक विशेष कमिटी नेमून त्यांच्या विचारानेच काम पुढे नेले जाईल.” नगरपंचायतच्या माध्यमातून या भागाला ‘क्रीडा नगरी’ म्हणून विकसित करण्याचा आमचा शब्द आहे, असेही डॉ.कांगणे यांनी ठासून सांगितले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, “जी विकास कामे होणे शक्य आहे, तेच आम्ही सांगत आहोत. मतदारांनी एकदा गाव विकास समिती व्हिजनला मत द्यावे. गाव विकास समिती व आम आदमी पार्टी युतीचा उमेदवार विजयी करावा.आमचा नगराध्यक्ष निवडून आल्यास आम्ही कांगणे वाडी येथे देवरुखातील भव्य कबड्डी स्टेडियम उभारून दाखवू,” असा विश्वास डॉ. मंगेश कांगणे यांनी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3206137
Share This Article