GRAMIN SEARCH BANNER

खेड : लोटेमाळ माळवाडी येथे किराणा दुकानात झालेल्या किरकोळ वादातून तरुणीला मारहाण

Gramin Varta
182 Views

खेड :  तालुक्यातील लोटेमाळ माळवाडी येथे किराणा दुकानात झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणीला मारहाण झाल्याची घटना ३ मे रोजी दुपारी घडली असून, या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश संजय भालेकर (वय २४, रा. लोटेमाळ, माळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची चुलत बहीण गौरी भालेकर व तिची मैत्रीण स्वरा काते या दोघी आरोपी रसीका शंकर नलावडे यांच्या मालकीच्या ‘मातोश्री किराणा स्टोअर्स’ येथे चिकन मसाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गौरी भालेकर हिने आरोपीशी एकेरी भाषेत संवाद साधल्याने वाद निर्माण झाला. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने दुकानातील काठीच्या साहाय्याने गौरी भालेकर हिला मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, ही बाब समजताच फिर्यादी नितेश भालेकर यांनी आरोपीला जाब विचारण्यासाठी गेल्यावर आरोपीने त्यांच्याशीही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या गौरी भालेकर हिला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११८(१) व १११(२) नुसार गुन्हा क्रमांक १२७/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitor Counter

3356532
Share This Article