चिपळूण : मुलानेच मित्रांच्या मदतीने घरच्या सोन्यावर डल्ला मारला; ४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read
This is masked man robber with stolen gold.

चिपळूण: आपल्याच राहत्या घरातून सोन्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना चिपळूणमधील उक्ताड परिसरात घडली असून, यात फिर्यादीच्या मुलानेच आपल्या मित्रांच्या मदतीने सोन्याचे तुकडे चोरून विकल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुदेश बरकू फके (वय ५३, रा. उक्ताड) हे शेती व्यवसाय करतात. १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातील कपाटात ठेवलेले ३० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या लगडीचे पाच छोटे तुकडे गहाळ झाल्याचे लक्षात आले. या सोन्याची बाजारपेठेतील किंमत अंदाजे ४ लाख २० हजार रुपये इतकी आहे. सखोल चौकशी केल्यानंतर, फिर्यादी यांचा मुलगा श्रेयस सुदेश फके यानेच हे सोने चोरल्याचे समोर आले. श्रेयसने हे सोने त्याचे मित्र सिद्धार्थ रमेश चव्हाण आणि रमेश लाला चव्हाण (दोन्ही राहणार जुनी कणसेवाडी) यांच्या मदतीने चिपळूणमधील एका सोनाराकडे विकले.

घरातील विश्वासाच्या व्यक्तीनेच आर्थिक फायद्यासाठी अशा प्रकारे चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सुदेश फके यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी श्रेयस फके, सिद्धार्थ चव्हाण आणि रमेश चव्हाण या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५ (क) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, चोरी गेलेले सोने हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घरगुती चोरीच्या प्रकारामुळे कुटुंबात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *