GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : वॉटर सप्लाय करणाऱ्या मदतनीसचा आकस्मिक मृत्यू

देवरूख : साडवली एमआयडीसीमध्ये वॉटर सप्लाय मदतनीस म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा कर्मचारी नेहमी दारूच्या नशेत असायचा, त्यामुळे त्याचा मृत्यू दारूच्या अतिसेवनाने झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शंकर पाटील (वय ५०, मूळ रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हे साडवली एमआयडीसी येथील मार्लेश्वर मिडोज आय.टी.आय. शेजारी एकटेच राहत होते. ते वॉटर सप्लाय मदतनीस म्हणून कामाला होते. त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते आणि ते नेहमी दारूच्या नशेत असत.

दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले नाहीत. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या खोलीत पाहणी केली असता, ते अंथरुणावर उलथ्या अवस्थेत बेशुद्ध पडलेले आढळले. तात्काळ खबर देणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या नातेवाईकांना, विशेषतः कोल्हापूर येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाला या घटनेची माहिती दिली.

नातेवाईकांनी तातडीने जवळच्या लोकांना मदतीला पाठवले. त्यांनी रुग्णवाहिकेने सचिन पाटील यांना उपचारासाठी देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर, पोलिसांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२.२१ वाजता अकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2475129
Share This Article