GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पावस येथे वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा पसार

Gramin Varta
370 Views

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप परिसरात पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून अज्ञात चोरट्याने पलायन केल्याची घटना घडली आहे. शुभदा कामतेकर (वय ७२) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोळप येथील एका दुकानाच्या मागील बाजूस घडली. शुभदा कामतेकर या रस्त्याने पायी जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि तो घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेनंतर परिसरात घबराट पसरली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Total Visitor Counter

3367960
Share This Article