GRAMIN SEARCH BANNER

बिग बॉस विजेती तन्वी कोलते हीचा देवरूख कला अकादमीतर्फे यथोचित सत्कार

देवरूख कला अकादमीच्या सत्काराने भारावून गेले- तन्वी कोलते

देवरूख : बिग बॉस मराठी सिझन ६ ची विजेती संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची कन्या तन्वी कोलते हीचा देवरूख कला अकादमीतर्फे शुक्रवारी यथोचित सत्कार करण्यात आला आहे. हा सत्कार सोहळा देवरूख येथील हाँटेल पार्वती पँलेस येथे पार पडला. देवरूख कला अकादमीच्या सत्काराने आपण भारावून गेल्याचे तन्वी कोलते हिने बोलताना म्हटले आहे.

बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकणारी बिग बॉस विजेती तन्वी कोलते ही शुक्रवारी आपल्या साखरपा या मायभूमीत परतली असून देवरूख कला अकादमीतर्फे शुक्रवारी सकाळी ११ वा. देवरूख येथे तिच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अकादमीचे सर्वेसर्वा व अभिनेते असित रेडीज यांच्याहस्ते सन्मानपत्र देवून तिचा सन्मान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना तन्वी कोलते म्हणाली कि, आपल्या कोकणात खूप टँलेंट आहे. आपली मुले- मुली पुढे गेली पाहिजेत. यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. देवरूख कला अकादमी येथील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी करत असलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार तन्वीने काढले. या अकादमीतून चांगले कलाकार घडतील, असा विश्वासही तन्वीने व्यक्त केला.

याप्रसंगी अभिनेते असित रेडीज यांनी बोलताना म्हटले कि, बिग बाँस विजेती तन्वी ही संगमेश्वर तालुक्याची सुकन्या असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कोणतीही गोष्ट मनापासून केली तर नक्कीच यश मिळते हे तन्वीने करून दाखवले आहे. आपल्याला काहीतरी नवीन घडवायचे असेल तर वेळ द्यावा लागतो. अकादमीच्या माध्यमातून येथील कलाकार घडवायचे असून हाच उद्देश अकादमीचा असल्याचे रेडीज यांनी स्पष्ट केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, प्रशांत काबदुले, रंजना कदम, रेवा कदम, विजय राऊत आदिंसह अन्य मान्यवर व तन्वीप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युयुत्सू आर्ते यांनी केले. तर सर्वांचे आभार प्रशांत काबदुले यांनी मानले.

Total Visitor Counter

3486809
Share This Article