सातारा : सालाबाद प्रमाणे याही वर्षी विश्वगौरवविभूंषित परमसिध्द स्वामी गगनगिरी महाराजांचे आरळे (सातारा) येथील प्रसिद्ध गगनगिरी आश्रमातून गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पायी दिंडी सोहळ्यास मान्यवराचे उपस्थितीत व गगनगिरी सेवेकरी मंडळीचे साथीने प्रारंभ झाला असून यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे गगनगिरी सेवेकरी मंडळी मध्ये प्रचंड उत्साह व आनंद पहावयास मिळत आहे.
या पायी दिंडीस खोपोलीआश्रमाचे श्री.आशिष महाराज हे खोपोलीहून श्रीक्षेत्र आरळे (सातारा) येथे आले होते,त्याच्या उपस्थितीमुळे भाविक भक्त परिवारामध्ये व गगनगिरी सेवेकरी मंडळी मध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. प.पू.श्री आशिष महाराजांचे शुभहस्ते,या चैतन्यमय पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला.
सदर पायी दिंडी यात्रा ही ९ दिवस चालत राहणार असून स्वातंत्र्य दिनी स्वामी गगनगिरी महाराजांचे चैतन्य दायी समाधीस्थानी अर्थात तीर्थराज योगाश्रम खोपोली येथे शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी स्वामी गगनगिरी महाराजांचे जयघोषात प्रवेश करेल
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीत सोहळ्यात सहभाग घेवून दि.१७ ऑगस्टला आरळे आश्रमात येईल.
या पायी दिंडी यात्रेस जरंडेश्वर देवस्थानाचे श्री.शंकर महाराज तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व गगनगिरी महाराज भक्तमंडळी सहभागी झाली आहेत.
सदर पायी दिंडी यात्रा सोहळ्यात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी तसेच विविध भागातील गगनगिरी भक्त मंडळीनी सहभागी होऊन सहकार्य करावे,असे आवाहन आरळे आश्रमाचे मठाधिपती महंत श्री.हरिहरानंदगिरीजी महाराज यांनी केले आहे.
आरळे गगनगिरी आश्रम (सातारा) येथून निघालेल्या पायी दिंडी यात्रेचे स्वातंत्र्यदिनी खोपोलीत आगमन!
