GRAMIN SEARCH BANNER

अखेर सस्पेन्स संपला! गाव विकास समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ‘आप’च्या चिन्हावर निवडणूक लढवणार

Gramin Varta
193 Views

देवरुख: देवरुख नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी गाव विकास समिती कडून निर्माण झालेला चिन्हाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. अपख उमेदवारांना चिन्ह प्रचारासाठी अवघे चार दिवस मिळणार असल्याने अखेर गाव विकास समितीच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या युतीच्या उमेदवार दीक्षा खंडागळे या आम आदमी पार्टीच्या ‘झाडू’ चिन्हावर निवडणूक लढवतील, असा अंतिम निर्णय कोर कमिटीने घेतला आहे. तसेच, गाव विकास समितीने दाखल केलेला अपक्ष अर्ज मागे घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

अपक्ष अर्ज मागे घेण्याचा निर्णय:
गाव विकास समितीने सुरुवातीला आपला युतीचा उमेदवार ‘आप’च्या चिन्हावर मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर गाव विकास समितीने स्वतंत्र अपक्ष अर्ज देखील दाखल केल्याने गाव विकास समिती नेमकी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मंगळवारी गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टी युतीच्या वतीने दाखल केलेले दोन्ही अर्ज वैध ठरले. यानंतर सायंकाळी पार पडलेल्या कोर कमिटीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी कोर कमिटी सदस्यांसह चर्चा करून हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.

अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळत असल्याने आणि चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अडचण येऊ नये या बाबीचा विचार करून, युतीच्या उमेदवाराने ‘आप’च्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

‘आप’च्या चिन्हावर लढण्याचा निर्णय कशासाठी?

गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी निर्णय स्पष्ट करताना सांगितले की, “निवडणूक आयोगाने अर्ज वैध ठरल्यानंतर अपक्ष उमेदवारांना तात्काळ चिन्ह वाटप करणे गरजेचे आहे. अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी फार कमी वेळ यावेळी मिळाला आहे. २६ तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर ३० तारखेला प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांची चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मर्यादा आहेत. ही बाब लक्षात घेऊन गाव विकास समितीच्या कोर कमिटीने, गाव विकास समिती-आम आदमी पार्टी युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय अंतिम केला आहे.”

या निर्णयामुळे आता दीक्षा खंडागळे या ‘झाडू’ चिन्हावर निवडणूक लढवणार हे निश्चित झाले असून, प्रचारात चिन्हाचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे.

Total Visitor Counter

3214248
Share This Article