GRAMIN SEARCH BANNER

राजपुरातून दुसरी दुचाकी चोरीला; अज्ञातावर गुन्हा

Gramin Varta
197 Views

राजापूर:  राजापूर तालुक्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. नाटे येथील चिंचबंदर परिसरातून एका मच्छीमाराची होंडा सीबी शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या प्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या वाहनाची किंमत सुमारे २०,००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

तुषार एकनाथ आडिवरेकर (वय-४५, रा. तुळसुंदे उगवतीवाडी) या मच्छीमार व्यावसायिकाची ही मोटारसायकल आहे. फिर्यादी आडिवरेकर हे दि. २६/०९/२०२५ रोजी रात्री १०.२० वाजेच्या सुमारास त्यांची एम.एच. ०७ ए.के. ८१७० क्रमांकाची काळ्या रंगाची होंडा शाईन घेऊन नाटे येथे बोटीवर कामाला जाण्यासाठी आले होते. त्यांनी आपली मोटारसायकल नाटे चिंचबंदर, जुनीतर येथे रस्त्याच्या कडेला व्यवस्थित लावून, चावी काढून ठेवली आणि ते ‘हबीबा शकिना’ या बोटीवर तांडेल म्हणून कामावर गेले.

दुसऱ्या दिवशी, दि. २७/०९/२०२५ रोजी दुपारी ०१.३० वाजेच्या सुमारास हवामान खराब झाल्याने ते पुन्हा नाटे डुंगेरी जेड्डी येथे परतले आणि घरी जाण्यासाठी मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी आले. मात्र, तिथे त्यांची मोटारसायकल दिसून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय ही सन २०१८ चे मॉडेल असलेली मोटारसायकल चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेनंतर तुषार आडिवरेकर यांनी दि. २८/०९/२०२५ रोजी नाटे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीनुसार, गु.आर.क्र. ६७/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३७९ (चोरी) अंतर्गत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या अज्ञात चोरट्याचा आणि चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा कसून शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3369387
Share This Article