रत्नागिरी : आंबेशेत येथील ६२ वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ही घटना रविवार, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. आंबेशेत येथील रहिवासी विशाखा विश्वास नागवेकर (वय ६२) यांना हृदयविकाराचा त्रास होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर मुंबईच्या केईएम रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती. रविवारी सायंकाळी त्या घरी असताना अचानक त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला आणि त्यांना श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. याच वेळी त्यांना उलटीही झाली.
कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दाखल करून तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने आंबेशेत येथील वृद्धेचा मृत्यू
