खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी-कातळ पवारवाडीजवळ एका कारला धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी ट्रक चालक प्रदीप गहिणीनाथ लांडगे (रा. भोसरी-पुणे) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आयशर कार चालक जितेंदर पुन्नीलाल सरोज (रा. कुलाबा-मुंबई) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सरोज हे आपल्या ताब्यातील आयशर कार (एम.एच. ०१ ई.एम. २७२४) घेऊन गोवा येथून कुलाबा येथे जात होते. याच दरम्यान, मागच्या बाजूने आलेल्या ट्रकने (एम.एच. १२ जे.यू. ७९६९) त्यांच्या कारला धडक देऊन अपघात घडवला, असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.