GRAMIN SEARCH BANNER

देवरुख: कोंडगाव तिठा परिसरात जुगार अड्ड्यावर छापा

Gramin Varta
194 Views

देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे उघड्या जागेत बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवणाऱ्या एका इसमावर देवरुख पोलिसांनी यशस्वी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, संबंधित आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कोंडगाव तिठा येथील एका उघड्या जागेत ‘कल्याण’ नावाचा मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे देवरुख पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी मंदार पावसकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी छापा टाकला. यावेळी विनायक सखाराम मांडवकर (वय ५६, रा. कोंडगाव मांडवकरवाडी, ता. संगमेश्वर) हा स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना जुगार खेळ चालवताना मिळून आला.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून १,०७० रुपये रोख आणि जुगाराचे इतर साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी विनायक मांडवकर याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, सायंकाळी ६.०२ वाजता या संदर्भातील अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास देवरुख पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3379163
Share This Article