देवरुखात सापडली अतितीव्र कुपोषित बालिका

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

देवरुख : शहरातील कांजीवरा अंगणवाडी येथील श्रीनिधी मारुती दानोळे (वय 1.8 वर्ष) ही बालिका अतितीव्र कुपोषित या श्रेणीत आढळून आली आहे. या बालिकेला देवरुख ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.

कुपोषित बालिकेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप माने व आरबीएसके पथक क्र 01 चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव धामणे धामणे, डॉ. पावरी तसेच औषधनिर्माता कांचन, परिचारिका टाकळे या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे तिला देवरुख ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र येथे 27 मार्च 26 रोजी दाखल करण्यात आले होते.

तिच्या पालकांना रोजचा आहार व औषोधोपचार याबाबत माहिती देण्यात आली. या बालिकेचे केंद्रात दाखल करतेवेळीचे वजन हे 8.500 होते त्यामुळे तिला 7 दिवस पोषण पुनर्वसन केंद्र, देवरुख येथे राहण्याचा सल्ला दिला गेला. सात दिवसांनंतर वजन 9.100 झाल्यावर बालिकेला घरी सोडण्यात आले. तिला अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रज्ञा खांडेकर, सेविका चित्रा कदम व मदतनीस स्नेहल मुळ्ये यांनी दाखल केले होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *