राजापूर : नुकत्याच पार पडलेल्या 25व्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत ओणी गावची कन्या कुमारी परी संजय जडयार हिने रौप्यपदक पटकावले. लांजा तालुका तायक्वांदो फिटनेस अकॅडमीचे प्रतिनिधित्व करत परीने अत्यंत दमदार कामगिरी करत हे यश मिळवले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुमारी परी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजापूर तालुका सचिव श्री. संजय विष्णू जडयार (गोरुळेवाडी, ओणी) यांची कन्या असून, तिच्या यशामागे तिला लाभलेले प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. राष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक तेजस्विनी आचरेकर मॅडम, तेजस पावसकर सर, गौरव खेडेकर सर, शीतल आचरेकर मॅडम आणि आई पायल जडयार यांचे मार्गदर्शन तिला लाभले.
परीच्या या यशामुळे ओणी गावासह संपूर्ण लांजा तालुक्याचा अभिमान वाढला असून, भविष्यातही ती अशाच प्रकारे यश मिळवत राहो, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
राजापूर ओणीची कन्या परी जडयारला तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक
