टिसीएस प्रकरणातील निदा खानच्या जामीन अर्जावरती २ मे ला निर्णय

saurabhsalvi26@gmail.com
3 Min Read

एमआयएमच्या जलील यांनी केला भेटल्याचा दावा, पोलिसांच्या तपासावर शंका

नाशिक : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदाखान विचार जामीन अर्जावरती न्यायालय कडून तारीख पे तारीख सुरू असून याबाबतची पुढील सुनावणी ही दोन मे रोजी होणार आहे तोपर्यंत निदा खान तिच्यावर अटकेची तलवार कायम आहे दरम्यान हे सर्व नाट्य घडत असताना पोलिसांना ती सापडत नाही मात्र एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आपण निदाखान ला भेटून आल्याचा दावा केल्याने पोलिसांच्या तपास पथकावरती संशय व्यक्त केला जात आहे.

मागील तीन आठवड्यापूर्वी नाशिक मधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएस या आयटी कंपनीमध्ये कंपनीतील आठ मुस्लिम कर्मचाऱ्यांनी हिंदू धर्मातील महिला मुली तसेच पुरुषांवर अत्याचार करत मुस्लिम धर्माची शिकवण अंगीकृत करावी याबाबत प्रयत्न केले होते यातील काही पुरुषांनचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील पुढे आले होते तर काही महिलांना जोर जबरदस्ती करून लैंगिक शोषण देखील केल्याचे घटना समोर आली होती या सर्व प्रकरणांमध्ये दोन महिला आणि सहा पुरुष हे प्रमुख मुस्लिम कर्मचारी असल्याचे समोर आले होते त्यातील आत्तापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून यातील निदाखान ही महिला अद्यापही फरार आहे.

निदा खान ही टीसीएस कंपनीमध्ये टेली ऑपरेटर असल्याचे सांगितले जात असले तरी देखील ती एच आर पदावरती असल्याचे देखील बोलले जात आहे तिने हे सर्व करण्यासाठी महिलांवरती मोठ्या प्रमाणावर दबाव आणण्याचे देखील समोर आलेले आहे यातील काही महिलांना लैंगिक शोषणासाठी भाग पाडल्याचे देखील सांगितले जात आहे याबाबत यातील जे काही फिर्यादी आहे. यांच्याकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार हे सगळे प्रकरण निदाखान हिच्या भोवती फिरत आहे दरम्यान घटना घडल्यानंतर निदाखान ही फरार झाली तिच्या शोध पोलीस घेत आहे तिने पोलिसांना गुंगरा देत एडवोकेट कासलीवाल यांच्यामार्फत नाशिक रोड न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता त्यावरती मागील आठवड्यामध्ये सुनावणी झाल्यानंतर आज 27 तारखेला सुनावणी होणार होती न्यायालयाने सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर यावरती दोन मे रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय दिला असून तोपर्यंत निदा खान याच्यावरती अटकेची तलवार ही कायम आहे. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये न्यायालयात तारीख सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सोमवारी बोलताना आपण निदा खान तिची भेट घेतली असून तिच्याशी चर्चा केली आहे त्यातून काही बाबी समोर येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे ज्या चर्चेमध्ये अजून काय बोलणे झाले हे सांगण्यास मात्र जलील यांनी नकार दिला आहे त्यामुळे पोलिसांना गुंगारा देणारी निदा ही पोलिसांना न भेटता जलील यांना कशी भेटली असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे पोलिसांच्या तपासावरती देखील प्रश्नचिन्ह उभ राहत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *