GRAMIN SEARCH BANNER

दहावी पास उमेदवारांना विमानतळावर काम करण्याची संधी, 1446 पदांसाठी भरती सुरू

Gramin Varta
1.1k Views

नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी दिल्लीसह देशभरातील विमानतळांवर ग्राउंड स्टाफ आणि लोडरच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

या भरतीअंतर्गत 1446 पदांसाठी उमेदवारांनी निवड केली जाणार आहे. ज्यांना अनुभवाशिवायच विमानतळासारख्या गतिमान क्षेत्रात करिअर सुरू करायचे आहे अशा दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे.

या भरतीसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 सप्टेंबर 2025 आहे. या तारखेपर्यंत इच्छुक उमेदवार www.igiaviationdelhi.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती फ्रेशर्ससाठी स्वप्नवत संधी आहे. या भरतीमुळे आर्थिक स्वावलंबन आणि व्यावसायिक अनुभव मिळवण्याचा मार्ग खुला होईल.

भरतीचे तपशील

पदे: ग्राउंड स्टाफ (पुरुष/महिला), लोडर (केवळ पुरुष)
एकूण जागा: 1446
शैक्षणिक पात्रता: 10वी किंवा 12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
पगार: 15,000 ते 35,000 रुपये मासिक
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा आणि मुलाखत
अर्जाची अंतिम तारीख: 21 सप्टेंबर 2025
अधिकृत संकेतस्थळ: www.igiaviationdelhi.com


पदांचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या

ग्राउंड स्टाफ:

प्रवाशांचे चेक-इन आणि टिकिट तपासणी करणे
आरक्षण आणि माहिती प्रदान करणे
टर्मिनल व्यवस्थापनात सहभाग
प्रवाशांना सहाय्य आणि मार्गदर्शन


एअरपोर्ट लोडर:
सामान चढवणे आणि उतरवणे
ट्रॉली हाताळणे आणि व्यवस्थापन
केबिन स्वच्छता राखणे
तांत्रिक कर्मचाऱ्यांना सहाय्य करणे
अर्ज कसा करावा?

www.igiaviationdelhi.com या अधिकृत संकेतस्थळावर जा.
“Apply Online” लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क ऑनलाइन भरा आणि अर्ज सादर करा.
अर्जाची प्रिंट कॉपी भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.
फ्रेशर्ससाठी मोठी संधी

या भरतीअंतर्गत अनुभवाची आवश्यकता नसल्याने करिअरला सुरुवात करण्याची फ्रेशर्ससाठी मोठी संधी आहे. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 ते 35,000 रुपये मासिक पगार मिळेल. दिल्लीसह देशभरातील विमानतळांवरील रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. 10वी आणि 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी करिअरची नवी दिशा ठरू शकते. लक्षात ठेवा, 21 सप्टेंबर 2025 ही अर्जाची अंतिम तारीख आहे.

Total Visitor Counter

2645633
Share This Article