गुहागर : तालुक्यातील तळवली आगरवाडी नं. १ येथील ६७ वर्षीय बाळ बेडमते यांनी रविवारी (दि. २० जुलै) आजारपणाने त्रस्त होऊन अखेर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बाळ बेडमते हे गेल्या काही काळापासून हर्निया व लघवीच्या आजाराने त्रस्त होते. दीर्घकालीन आजारपणामुळे शारीरिक आणि मानसिक यातना सहन करणे त्यांना कठीण जात होते. रविवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते त्यांच्या राहत्या घरात हॉलमध्ये होते. मात्र, दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातील लाकडी छताला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
कुटुंबीयांनी त्यांना अशा स्थितीत पाहताच स्थानिकांना आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात अकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुहागर : आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
