GRAMIN SEARCH BANNER

महसूलने जप्त केलेला ट्रक चोरून नेणाऱ्या मालकाला देवरूख पोलिसांनी साखरप्यातून घेतले ताब्यात

Gramin Varta
500 Views

संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख येथे महसूल विभागाने जप्त केलेला तब्बल १९ लाखांचा ट्रक काही दिवसांपूर्वी चोरीस गेला होता. या प्रकरणातील संशयित ट्रक मालकाला देवरूख पोलिसांनी साखरपा येथून अटक केली आहे.

शरणबसप्पा धरमण्णा तळवार (रा. कलंहागरगा, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

या कारवाईत देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो. हे. काॅ. आर्या वेलवणकर, पो. हे. काॅ. सचिन कामेरकर, पो. हे. काॅ. सचिन पवार, पो. हे. काॅ. अभिषेक वेलवणकर व चालक पो. काॅ. पाटील यांनी सहभाग घेतला. देवरूख पोलिसांच्या या चोख कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3073094
Share This Article