GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक मालमत्तांचे दीड कोटींचे नुकसान

Gramin Search
11 Views

रत्नागिरी: दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यात सार्वजनिक मालमत्तांचे दीड कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील  अंशत: आणि पूर्णत: अशा एकूण 130 घरांचे सुमारे 44 लाखांचे नुकसान झालेले आहे.  पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. काही घटनांत जिवीतहानी देखील झालेली आहे. या कालावधीत पाण्यात बुडुन आणि वीज पडुन दोघांचा मृत्यू झाला. तर संरक्षक भिंत कोसळुन व अन्य घटनांनी पाच जखमी झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. याबाबतचा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत झालेल्या नुकसानीच अहवाल तयार करण्यात आला आहे. 

अंशत: कच्चे 2 घरांचे 93 हजाराचे नुकसान झाले आहे. तर अंशत: 128 पक्क्या घरांचे सुमारे 43 लाखाचे नुकसान झाले आहे. तर तीन पुर्णत: गोठ्यांचे 71 हजार व 13 अंशत गोठ्यांचे 6 लाख 26 हजार एवढे नुकसान झाले आहे. पशुधनामध्ये 1 जणावर दगावले आहे. एनडीआरएमचे 1 पथक रत्नागिरीत आहे.

Total Visitor Counter

2650969
Share This Article