रत्नागिरी : शहरातील आयटीआय समोरील नाचणे रोडवर गुरुवारी रात्री झालेल्या अपघाताने परिसर हादरला. लाल रंगाची स्कॉर्पिओ भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. ही घटना गुरवारी रात्री सुमारे ८.३० वाजता घडली.
झाडावर धडक देण्यापूर्वी स्कॉर्पिओने एका दुचाकीला धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. अपघातानंतर काही काळ वाहतुकीची तीव्र कोंडी निर्माण झाली. स्कॉर्पिओचे मोठे नुकसान झाले असल्याने वाहन बाजूला करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने गाडी रस्त्याबाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बघ्यांची गर्दी हटवून रस्त्यावरची परिस्थिती नियंत्रणात आणली.
रत्नागिरी : नाचणे रोडवर स्कॉर्पिओ झाडावर आदळली; दुचाकीस्वार जखमी
