रत्नागिरी; लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलने ज्वारीपासून बनविलेल्या खाद्यपदार्थांची स्पर्धा आयोजित केली आहे.
या रत्नागिरी तालुकास्तरीय पाककला स्पर्धेत ज्वारीपासून बनविलेले नावीन्यपूर्ण तिखट आणि गोड पदार्थ सादर करता येतील.
स्पर्धा रविवार, दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता हातखंबा झरेवाडी रस्त्यावर हॉटेल मु.पो. झरेवाडी येथे होईल. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५०० आणि १००० रुपये रोख, तर उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना प्रत्येकी ७०० रुपये आणि सन्मानचिन्ह दिले जाईल. याशिवाय बेस्ट प्लेटिंग प्रेझेंटेशनसाठीही ७०० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला शेफकॅप आणि सहभाग सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून पदार्थ घरून बनवून आणावयाचा आहे. स्पर्धेत शाकाहारी पदार्थच ग्राह्य आहेत. एका स्पर्धकाचा एकच पदार्थ ग्राह्य आहे. सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. पदार्थाची चव, पौष्टिकता,मांडणी आणि सजावट, या पार्श्वभूमी विजेत्यांची निवड करण्यात येईल. पदार्थ मांडणीसाठी व सजावटीसाठी आवश्यक साहित्य स्पर्धकाने स्वतः आणावयाचे आहे. स्पर्धेच्या दिवशी पदार्थ मांडणीसाठी दुपारी दीड ते अडीच ही वेळ असून त्यानंतर साडेतीन वाजेपर्यंत परीक्षण केले जाईल.
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी
गिरीश शितप (8999566429) किंवा प्रतीक कळंबटे (9960902203) यांच्याशी संपर्क साधावा. नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ ऑगस्ट ही आहे.
रत्नागिरी : ज्वारीपासून बनविलेल्या खाद्यपदार्थांची स्पर्धा
