दुचाकी चालवतानाच हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू; महिलेला दुखापत

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथे दुचाकी चालवत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने शहरातील ठेकेदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. लखु हरिश्चंद्र राठोड (७५, रा. मांडवी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राठोड हे १५ जानेवारी रोजी वरवडे समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यावरून दुचाकीने जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीवर मागे मौलनबी मसाक सुंबड (५४, रा. परटवणे, रत्नागिरी) या बसल्या होत्या. वरवडे किनारी रस्त्यावर दुचाकी चालवत असताना राठोड यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते वाहनासह खाली कोसळले.
या घटनेत लखु राठोड यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या मौलनबी सुंबड या खाली पडल्याने जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *