GRAMIN SEARCH BANNER

भाजपा महिला मोर्चातर्फे पोलीस सेवेत कार्यरत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

Gramin Varta
110 Views

रत्नागिरी : “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या अर्थपूर्ण घोषवाक्याखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरी तर्फे प्रभाग क्र. ८ येथील रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पोलीस सेवेत कार्यरत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि सौ. कामना बेग यांनी केले.

या शिबिरात महिलांसाठी दात तपासणी, गर्भाशय तपासणी तसेच कर्करोग मार्गदर्शन अशा विविध मोफत तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पोलिस सेवेत कार्यरत असलेल्या महिलांनी या शिबिराचा उत्साहाने लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक फडके मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक बगाटे साहेब यांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

या प्रसंगी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये, शहर अध्यक्षा सौ. भक्ती मनोर दळी, ओबीसी शहर अध्यक्षा सौ. सोनाली केसरकर, शहर खजिनदार सौ. शोनाली आंबेरकर, तालुकाध्यक्ष सौ. सुचिता नाचणकर तसेच अनुश्री आपटे, प्रणाली रायकर, प्रज्ञा टाकळे, अनुष्का शेलार, सिया घाग, राधिका आपटे आदी मान्यवर उपस्थित होत्या.

कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पोलीस कर्मचाऱ्यांकडून भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

पोलीस अधीक्षक बगाटे साहेब आणि उपअधीक्षक फडके मॅडम यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत म्हटले की, महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. महिलांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे तरच निर्माण होईल “स्वस्थ नारी, सशक्त परिवार.”

Total Visitor Counter

2645204
Share This Article