GRAMIN SEARCH BANNER

कोदवली नवीन धरणाच्या कामाची नगराध्यक्ष सौ.हुस्नबानु खलिफे यांनी केली पाहणी

Gramin Varta
171 Views

राजापूर: राजापूरच्या नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. हुस्नबानु खलिफे यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कोदवली नवीन धरणाच्या कामाची पाहणी केली.

पाहणीदरम्यान धरणाच्या कामामध्ये उर्वरित राहिलेल्या १७ गेटचे काम, एम-३० काँक्रीटचे काम, सीपीसीसी ट्रीटमेंट, पाइपलाइन टाकण्याचे काम, धरणावर जाण्यासाठी काँक्रीट पोहोच रस्ता, तसेच विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली. संबंधित कामांची गुणवत्ता, गती आणि वेळेत पूर्तता होण्याबाबत नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी धरणाच्या प्रगतीपथावरील विविध कामांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. यावेळी राजापूर पालिका कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, स्वप्नील पड्यार, दिवाकर खडपे, कंत्राटदार गदगू जाधव आदी उपस्थित होते. कोदवली नवीन धरण पूर्ण झाल्यानंतर धरणातील पाण्याची साठवण सुरू झाल्यानंतर राजापूर शहराला पाण्याची टंचाई कायमची दुर होणार असल्याची ग्वाही देण्यात आली.

Total Visitor Counter

3200981
Share This Article