रत्नागिरी : शहरातील राधाकृष्ण नगर परिसरात भरदिवसा घरफोडी करून दोन महागडे मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १३ जुलै रोजी सकाळी साडेदहा ते सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी १४ जुलै रोजी सायंकाळी ६.१७ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जितेंद्र संजय पाटील (वय २४, रा. ए-लतिफ बिल्डिंग, दर्गा माते जवळ, राधाकृष्ण नगर, रत्नागिरी – मूळ रा. वाडी बिके, ता. शिरपूर, जि. धुळे) हे श्री. तांबेकर यांच्या खोलीत भाड्याने राहत होते. घटनेच्या दिवशी ते नाश्त्यासाठी बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला आणि खोलीत ठेवलेल्या दोन बॅगमधून दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ३१,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
गेल्या मालामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:
१) रोख रक्कम – ₹१,५००/-
२) ONEPLUS NORD CE4 (DARK CHROME, ८/१२८) – ₹१५,०००/-
३) ONEPLUS NORD CE4 (DARK CHROME, ८/१२८) – ₹१५,०००/- असा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी राधाकृष्ण नगर येथे घरफोडी; दोन मोबाईल, रोख रक्कम लंपास
