गुहागर : गुहागर तालुक्यातील पालकोट या छोट्याशा गावातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कसोटीची झलक पाहायला मिळाली आहे. या गावातील प्रणय रघुनाथ वेद्रे याने दृढ इच्छा आणि जिद्दीच्या जोरावर शासनाच्या टाऊन प्लॅनिंग विभागात अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.
पालकोट गावचा सुपुत्र प्रणय रघुनाथ वेद्रे याने घरची हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा शिक्षणासाठी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर, वेगवेगळे सण उत्सव, खेळणे बागडणे तसेच, सर्वश्रुत क्रिकेट खेळ झुगारून फक्त अभ्यासाच्या जोरावर आपले स्वप्न व ध्येय पूर्ण केले.
प्रणय याने स्थापत्य अभियंता ते शासनाच्या टाऊन प्लॅनिंग असिस्टंट स्पर्धा परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण केल्या. या यशामुळे तालुका गुहागर येथे महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात अधिकारी/नगर रचना सहाय्यक या पदावर त्याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रणय याने मिळवलेल्या या यशाबद्दल संपूर्ण गुहागर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
गुहागरमधील पालकोटचा सुपुत्र प्रणय वेद्रे झाला टाऊन प्लॅनिंग विभागात अधिकारी!
