कुडाळ : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि वाहतूकी विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला.
यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत परब यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून उपरोधिक सत्कार केला आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत परब यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध केला.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ तालुक्यात अवैध दारू विक्रीची ठिकाणे आणि त्यामागे कार्यरत असलेल्या यंत्रणांची सविस्तर माहिती चार महिन्यांपूर्वी पत्र देवुन दिली होती. परंतु चार महीने उलटुन कारवाई न होता. राजरोज गोवा बनावटीची दारु विक्री सुरुच राहीली. म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले. आज रोजी अवैध दारु विक्रेत्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाकडे नव्याने देण्यात आली असुन सात दिवसात धंदे बंद न झाल्यास जिल्हाअधिक्षक कार्यालय दालनात आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.
मनसेच्या या आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग : मनसेकडून उत्पादन शुल्क विभागाला दारूच्या ‘बाटल्यांचा हार’
