जाकादेवी/ वार्ताहर:-रत्नागिरी तालुक्यातील जि प. ओरी केंद्र शाळा नं.१ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी विविध योगा-आसने सादर करुन हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने योगासन प्रात्यक्षिके केली.यावेळी उपशिक्षक श्री गणपती पडुळे यांनी कृतियुक्त मुलांना विविध योगांची प्रात्यक्षिकं करून दाखविले. उपस्थित मुलांकडून योगासने करून घेतली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय आंबवकर यांनी योगाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व तसेच आशिया खंडातील मोठ्या दिवसाचे भौगोलिक महत्व स्पष्ट केले.यावेळी शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ.समिक्षा संतोष पवार, उपशिक्षक रामदास चव्हाण, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.