कर्जत: वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असून रस्त्यावर होणारी पार्किंग अपुऱ्या वाहतूक नियंत्रक सुविधा आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या समस्येत अधिकच भर होत आहे.
अशा परिस्थितीत वाहतूक व्यवस्थापनासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे व कर्जत पोलीस ठाण्यात 100 ब्रिकेट प्रदान करून महत्त्वपूर्ण मदत केली आहे. आज दहिवली येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात हा बॅरिकेट वाटप सोहळा पार पडला. वाहतूक कोंडीही कर्जत शहरातील गंभीर समस्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिलेल्या वाहतूक नियमन अधिक प्रभावीपणे करता येईल हे बॅरिकेट विविध प्रमुख चौकांमध्ये वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. आपण पाहतच आहे की कर्जत शहरांमध्ये प्रत्येक शुक्रवार शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या उद्भवत असते. मागील चार ते पाच दिवसांपूर्वी साहेबांच्या मदतीने आम्ही श्रीरामपूर या ठिकाणी लावले तेव्हा निश्चितच आपल्याला परिणाम दिसून आलेला आहे. आता हे शंभर बैरिकेट आपल्याला प्राप्त झालेले ते आम्ही चार फाटा या ठिकाणी त्याचा वापर करून जे लेन कटिंग करतात ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात अशा वाहन चालकांना बसणार आहे असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगत त्यांनी प्रतीठानचे आभार व्यक्त केले.
आध्यात्मिक मार्गदर्शना सोबतच पर्यावरण रक्षण स्वच्छता मोहिमा आरोग्य शिबिर आणि वाहतूक नियमासाठी मदत अशा विविध सामाजिक उपक्रमातून प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचे प्रमुख अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानने केलेल्या मदतीबद्दल पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी पोलीस ठाण्याच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मानपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी प्रतिष्ठानचे स्त्री सदस्य भगवान भोसले श्रीधर गुंदाटे अशोक भागेत विनोदी येवले यांनी प्रतिष्ठानच्या वतीने मानपत्राचा स्वीकार केला. कार्यक्रमाची प्रस्तावना विकास चित्ते यांनी तर खडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रतिष्ठानचे अनेक स्त्री सदस्य व नागरी उपस्थित होते
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कर्जत पोलिसांना बॅरिकेड्स भेट
