GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी नाचणे येथे स्वतंत्र पोस्ट ऑफिसची जोरदार मागणी

Gramin Varta
22 Views

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नाचणे गावात स्वतंत्र पोस्ट ऑफिस स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, यासंदर्भात माजी सरपंच संतोष सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

या शिष्टमंडळाने पोस्टाचे अधीक्षक ए. डी. सरंगले आणि सहाय्यक डी. एस. कुलकर्णी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. नाचणे गावासाठी स्वतंत्र पोस्ट ऑफिस मिळावे, तसेच सध्याच्या सेवा सुधाराव्यात, या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

अधिकार्‍यांनी नाचणे गावातील पोस्ट सेवा सुधारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. भविष्यात ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव प्राप्त झाल्यास नाचणेस स्वतंत्र पोस्ट ऑफिस देण्यासाठी व सुविधा वाढवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या भेटीवेळी संतोष सावंत यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय चाचले, चंद्रकांत नार्वेकर आणि विजयकुमार ढेपसे हेही उपस्थित होते.

Total Visitor Counter

3388318
Share This Article