तालुकाप्रमुख आबा आडिवरेकर यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
राजापूर (प्रतिनिधी) – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजापूर तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख आबा आडिवरेकर यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करून भगवा ध्वज हाती घेतला.
या वेळी आडिवरेकर यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निरोप घेत शिवसेनेत प्रवेश केला. संपूर्ण सभास्थळ “जय शिवसेना”, “एकनाथ शिंदे आगे वाढा” अशा घोषणांनी दुमदुमून गेले.
कार्यक्रमात आमदार किरण सामंत म्हणाले, “राजापूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे. आबा आडिवरेकर यांच्या प्रवेशामुळे पक्षसंघटनेला नवी ऊर्जा मिळाली आहे. येत्या काळात शिवसेना संघटन आणखी जोमाने काम करेल.”
दरम्यान, आबा आडिवरेकर म्हणाले, “शिवसेना हा जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. राजापूर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकजुटीने काम करू.”
या कार्यक्रमात आबा आडिवरेकर यांच्यासोबत ऋषी राम मोरे (प्रदेश सदस्य), सुनील जाधव (महिला तालुकाप्रमुख), प्रगती रेडीज, गुरव सर, विनोद पवार, अमित चिले, जयेश दळवी, जावेद नाईक, इब्राहिम लांजेकर, संजय गुरव, जगदीश गुरव, सखाराम म्हाडये, रामेश म्हाडये, महादेव पड्यार, संजीव मोरे, रफिक नाईक, फकीर नाईक, नजीर टोले, फरहान गोलंदाज, आत्माराम नारकर, उत्तम नारकर, सूर्यकांता प्रमोद चव्हाण, प्रतीक घाट, विजय पावसकर, सूर्यकांत जाधव, लहू भागन, जगन्नाथ भागन, परशुराम घडची, बाजीराव विश्वासराव, दया शेठ शेलार, अक्षय मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा स्वीकारला.
या प्रसंगी जिल्हा संघटक प्रकाश कोवळेकर, दुर्वाताई तावडे, तालुकाप्रमुख दीपक नागले, अप्पा साळवी, सुनील गुरव, शैलेश साळवी, अविनाश पराडकर, दीपक बेंद्रे, आत्माराम सुतार, बाबालाल फरार, सुरेश ऐनाकर, बाबू वेरवडे, अमर जाधव, रवींद्र सावंत, विकास रेघे, मंदार सप्रे, गणेश तावडे, श्वेता पवार, विधी पांचाळ, बाळा चव्हाण, बाबा सावंत, तुषार पांचाळ, महादेव गुरव, संतोष बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.






