रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाच्या सेवा पंधरवडा या नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत फणसोप मंडळामध्ये “शाळा तेथे दाखला” या विशेष शिबिराचे आयोजन सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले.
या कॅम्पला अपर जिल्हाधिकारी मा. भाऊ गलांडे, उपविभागीय अधिकारी मा. जीवन देसाई, अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक मा. अविनाश पाटील, निवासी नायब तहसीलदार मा. माधवी कांबळे, श्री लक्ष्मी केशव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कमलाकर साळवी, महाविद्यालय प्राचार्या मा. नेत्रा राजेशीर्के, तसेच श्री रितेश साळवी, मिलिंद कांबळे, समदं भाटकर, राकी चौगुले, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सेतू कर्मचारी, आधार केंद्रचालक व पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शिबिरात १५० ते २०० नागरिक सहभागी झाले. यामध्ये विविध सेवा प्रदान करण्यात आल्या:
उत्पन्न दाखले (सेतू जमा) २७,अधिवास दाखले १९,जातीचे दाखले १९,उत्पन्न दाखले वाटप ८,जातींचे दाखले वाटप ३,नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र १,आधार अपडेट ४०,फेरफार ३,७/१२ उतारे ५,ई-रेशन कार्ड वाटप ४,रेशनकार्ड नाव कमी-जास्त १३,संजय गांधी योजना लाभ ४,विद्यार्थी खेळाडू सत्कार ५,एकूण लाभार्थी: १५१
फणसोप मंडळाच्या वतीने श्री लक्ष्मी केशव महाविद्यालय, कसोपं–फणसोप येथील गरीब व एक पालक असलेल्या विद्यार्थ्यांची वर्षभराची फी भरण्यात आली. एकूण ₹११,६०० ची मदत करण्यात आली.
कु. तनुजा विलास फुटक (१० वी) ₹२,७००,कु. रूद्र संजय मांडवकर (६ वी) ₹२,४००,कु. आर्या आग्रे (५ वी) ₹२,२००,कु. शुभम जयवंत राड्ये (५ वी) ₹१,९००,कु. पूर्वी अमित संते (६ वी) ₹२,४००,
हा उपक्रम स्थानिक नागरिकांसाठी लाभदायी ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली
फणसोप मंडळात ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम उत्साहात, “शाळा तेथे दाखला” या विशेष शिबिराचे आयोजन
