GRAMIN SEARCH BANNER

पाच नव्या एस टी बसेसचे मंडणगडात लोकार्पण

Gramin Search
7 Views

लवकरच मिनी बसेसचा ताफाही  उपलब्ध – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खेड आगार रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांची जागा घेण्यासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ५ एसटी बसेस आज मंडणगड एसटी आगारात सेवेत दाखल झाल्या. या नव्या बसेसचे लोकार्पण महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मंडणगड आगारात मोठ्या उत्साहात पार पडले. परिवहन विभागामार्फत पुढील टप्प्यात कोकणासाठी आवश्यक असलेल्या मिनी बसेसचा ताफा लवकरच जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे खेडोपाडी आणि दुर्गम भागातील प्रवास अधिक सोयीचा व जलद होईल, अशी माहिती यावेळी महसूल राज्यमंत्री श्री कदम यांनी दिली.

कोकणातील शेवटच्या गावापर्यंत वाहतूक सेवा पोहोचवण्यासाठी नव्या बसेसचा ताफा ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात मिनी बसेसचाही ताफा उपलब्ध करून देण्यात येईल, असे राज्यमंत्री श्री कदम यावेळी म्हणाले.

या उपक्रमामुळे मंडणगड व परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर होणार असून, ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळणार आहे. या नव्या बसेसच्या समावेशामुळे स्थानिक प्रवाशांसाठी अधिक सक्षम, जलद आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.
     

या लोकार्पण सोहळ्याला प्रतापदादा घोसाळकर, अस्मिता केंद्रे, सुरेश दळवी, हरिश्चंद्र कोदेरे, इरफान बुरोंडकर, संजय शेडगे, दीपक मालुसरे, आनंद भाटे, विनोद जाधव, चेतन सातोपे, आजी माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

2652393
Share This Article