रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे गवाणवाडी रस्त्यावर पादचाऱ्यास भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात पादचारी संदिप बाळकृष्ण दूधरे (रा. आगवे, जोशीवाडी, ता. लांजा) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ही घटना १४ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. अनिश दिपक कोलगे (रा. कोतवडे कोलगेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या प्रकरणी विलास बाळकृष्ण दूधरे (वय ५५) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विलासचा भाऊ संदिप दूधरे हे रस्त्याने चालत असताना आरोपीने आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्र. एम.एच.०८ ए.के.९७५२) ने जोरदार धडक दिली. धडकेनंतर संदिप रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघात प्रकरणी अनिश दिपक कोलगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी : कोतवडे येथे पादचाऱ्याला दुचाकी जोरदार धडक; लांजातील तरुण जखमी
