GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : राजापुरात पेट्रोल पंपावर जोरदार हाणामारी! लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डोकी फोडली

राजापूर – कोदवली येथील पेट्रोल पंपावर सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून पेटलेल्या दोन तरुणांनी एकमेकांवर तुटून पडत जबरदस्त लाथाबुक्क्यांची हाणामारी केली. डोकी फोडली, रक्त सांडलं आणि एकमेकांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याचे बोलले जातं आहे. भर सकाळच्या वेळी फ्री स्टाईल हाणामारीने बघ्यांची गर्दी केली होती.

हातांनी, पायांनी एकमेकांना तुडवत होते. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, शिवीगाळ करत एकमेकांवर मारत असलेल्या या दोघांची रागाच्या भरात शुद्ध हरपली. पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या वाहनांभोवती गोंधळ उडाला होता. मारहाणीचा आवाज दूरवर ऐकू येत होता.

हे तरुण एवढे बेधुंद झाले होते की, सोडवायला गेलेल्या लोकांनाही धक्के देत होते. डोक्यातून वाहणाऱ्या रक्त चेहऱ्यावर येत होते तरी त्यांना शुद्ध नव्हती.

या घटनेनंतर दोघांचीही वरात थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. त्यांना तत्काळ मेडिकलसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. या घटनेने कोदवलीसह संपूर्ण राजापूर शहरात खळबळ उडाली आहे.

हे सर्व पूर्वीच्या वैमनस्यातून घडल्याची जोरदार चर्चा आहे. किरकोळ कारण ठिणगी ठरली आणि रागाचा स्फोट इतका भयानक झाला डोकी फोडण्यापर्यंत मजल गेली. पोलिस तपास सुरू असून, प्रकरणाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

2455624
Share This Article