भव्य मिरवणुकीचे आयोजन
लांजा: लांजा तालुक्यासह शहरात उद्या शुक्रवारी ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्ताने लांजा शहरात दरवर्षीप्रमाणे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून भाविकांत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
सदर मिरवणूकीचा प्रारंभ उद्या शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता हजरत सय्यद चाँदशहा बुखारी बाबा यांच्या दर्गा येथून होणार आहे. पारंपरिक जल्लोष, धार्मिक गाणी आणि उत्साहाच्या वातावरणात ही मिरवणूक बाजारपेठेतून हनुमान मंदिर, जुनी बाजारपेठ, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा क्र.१, जामा मशीद, श्री देव चव्हाटा मंदिर मार्गे पुन्हा बाजारपेठेतून दर्गा येथे पोहोचेल.
दरम्यान, संध्याकाळी ७.३० वाजता या मिरवणुकीचा समारोप होणार असून लांजा शहरासह तालुक्यातील मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये धार्मिक कार्यक्रमांच्या तयारीने उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
लांजात उद्या ईद-ए-मिलाद होणार साजरी





