GRAMIN SEARCH BANNER

खेड : महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Gramin Varta
86 Views

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात पार्ले गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीची ट्रकला धडक बसून तुषार पवार (वय २८, रा. महाड) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार पवार हे महाड एमआयडीसीत काम करतात. रात्रपाळी पूर्ण करून ते दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली.

जखमी तुषार पवार यांना तात्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3377216
Share This Article