GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : आरएचपी फाउंडेशनतर्फे रमाकांतला मिळाली यांत्रिक व्हील चेअर

रत्नागिरी: शुभम रमाकांत चव्हाण (वय 26 वर्षे, पावस, ता. रत्नागीरी) येथील दिव्यांग तरुणाला आरएचपी फाउंडेशनतर्फे यांत्रिक व्हील चेअर उपलब्ध झाली.शुभमचे शिक्षण बारावीपर्यंत झाले.

वडील रमाकांत गोविंद चव्हाण रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात कर्मचारी होते. तब्बेत ठीक नसल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आई सौ. रश्मी महिला रुग्णालयात हाउसकीपिंगचे काम करतात. शुभमला एका विवाहितेसह दोन बहिणी आहेत. शुभम रत्नागिरीच्या उद्यमनगरातील सलूनचा व्यवसाय करत होता. २०१८ साली दिवसभर काम करून घरी परतत असताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला. मानेला मार लागल्याने क्वाड्राप्लेजिक (मानेपासून खाली शरीरात ताकद नसते) झाला. हातापायातील पूर्ण ताकद गेल्याने चालता येणे बंद झाले. स्वत:चे स्वत:ला काहीही करता येत नव्हते. व्हीलचेअर वापरावी लागते. सायन येथील पॅराप्लेजिक सेंटर आणि हजीअली येथे फिजिओथेरपीसाठी तो काही वर्षे होता. हातात थोडी थोडी ताकद आली. सध्या मुंबईतील शरण संस्थेत उपचार आणि फिजिओथेरपीसाठी वर्षभर तो जात आहे. हातात बर्‍यापैकी ताकद आल्याने स्वत:चे स्वत: आवरता येते. मात्र बाहेर जाऊन काम करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते.

एका शिबिरात त्याची आर एच पी फाऊंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे आणि सदस्य समीर नाकाडे यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी त्याने आपल्याला इलेक्ट्रिक व्हीलचेअरची गरज असल्याचे सांगितले. त्याची गरज लक्षात घेऊन आर एच पी फाऊंडेशनने अल्टीयस कंपनी, नॅशियो संस्था (चेंबूर) यांच्या सहकार्याने शुभम चव्हाणला यांत्रिक व्हीलचेअर मिळवून देली.

या स्वयंचलित गाडीमुळे त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होणार आहे. तो पूर्णत: स्वावलंबी होणार आहे. कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जाऊन काम करू शकणार आहे. अर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. कौटुंबिक परिस्थिती सुधारणार आहे. शुभम आणइ त्यांच्या कुटुंबीयांनी आर एच पी फाउंडेशनचे आभार मानले आहेत.

Total Visitor Counter

2475106
Share This Article